परप्रांतियांच्या लोंढ्यांमुळेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर – राज ठाकरे

परप्रांतियांच्या लोंढ्यांमुळेच परिस्थिती बिघडत असून महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत असल्याची टीका वजा मत, पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलंय. महिलांच्या सुरक्षेसाठी पक्षाच्या माध्यमातून राज्यभर संरक्षण शिबीर राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केलाय. 

Updated: Feb 1, 2015, 03:37 PM IST
परप्रांतियांच्या लोंढ्यांमुळेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर – राज ठाकरे title=

मुंबई: परप्रांतियांच्या लोंढ्यांमुळेच परिस्थिती बिघडत असून महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत असल्याची टीका वजा मत, पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलंय. महिलांच्या सुरक्षेसाठी पक्षाच्या माध्यमातून राज्यभर संरक्षण शिबीर राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केलाय. 

निमित्त होतं मुंबईतल्या काळाचौकी इथं महिलांसाठी आयोजित स्वसंरक्षण शिबिराचं. मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी एकलव्य सार्वजनिक संस्थेच्या माध्यमातून गेले सात दिवस महिलांसाठी स्वसंरक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं. जागतिक कीर्तीचे कमांडो प्रशिक्षक शिफु जी यांनी सुमारे दीड हजार महिला आणि शालेय तसंच महाविद्यालयीन मुलींना यात स्वसंरक्षणाचे धडे दिले. 

शिबिराचा समारोप राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रशिक्षणातून महिलांनी मिळवलेलं कौशल्य पाहून राज ठाकरे भारावून गेले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.