सचिन तेंडुलकर सरसावला आदीवासींच्या मदतीसाठी

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आदीवासींच्या मदतीसाठी पुढे आलाय. खासदार असलेल्या सचिनने मुंबईतील आरे कॉलीनीतील आदीवासी भागात सहा सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला. 

Updated: May 2, 2015, 12:26 PM IST
सचिन तेंडुलकर सरसावला आदीवासींच्या मदतीसाठी  title=

मुंबई : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आदीवासींच्या मदतीसाठी पुढे आलाय. खासदार असलेल्या सचिनने मुंबईतील आरे कॉलीनीतील आदीवासी भागात सहा सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला. 

याखेरीज आदीवासींमध्ये त्यानं ५०० सोलर लॅम्पच वाटपही केलय. वणीचापाडा, मताईपाडा, खंबयचापाडा, गावदेवीपाडा, गुटीनिचापाडा आणि फुटक्या तलावाचा पाडा या ठिकाणी सचिन शौचालय बांधून देणार असून प्रत्येक शौचालयासाठी दहा लाखांचा निधी तो देणार आहे.

 बिबट्याच्या भीतीने या पाड्यातील आदीवासी उघडयावरच शौचलयाला जात असल्याने ही शौचालय बांधल्यास आदीवासींची सोय होणार आहे. सचिन खासदार निधीतून ही काम करत आहेत. सचिन आपल्यासाठी काहीतरी करतोय हे पाहून इथंल्या आदीवासींमध्ये सचिनचं कौतुक होतय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.