व्हिडिओ: सिद्धार्थ कॉलेज राडा, प्राचार्य गुंडांची शिपायाला मारहाण

पिपल्स एज्यूकेशन सोसायटी कुणाची या वादाचा फटका आता सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बसतोय. सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राचार्य असल्याचा दावा करणारे दोन प्राचार्य आहेत. पिपल्स एज्यूकेशन सोसायटीवर दावा सांगणाऱ्या रामदास आठवले गट आणि आनंदराज आंबेडकर गटाचे दोन वेगवेगळे प्राचार्य कॉलेजमध्ये बसतात. पण या दोन्ही गटाचा वाद किती टोकाला पोहचलाय हे कॉलेजमधल्या सीसीटीव्ही फुटेजवरून कळेल.

Updated: Apr 20, 2015, 11:29 PM IST
व्हिडिओ: सिद्धार्थ कॉलेज राडा, प्राचार्य गुंडांची शिपायाला मारहाण title=

मुंबई: पिपल्स एज्यूकेशन सोसायटी कुणाची या वादाचा फटका आता सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बसतोय. सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राचार्य असल्याचा दावा करणारे दोन प्राचार्य आहेत. पिपल्स एज्यूकेशन सोसायटीवर दावा सांगणाऱ्या रामदास आठवले गट आणि आनंदराज आंबेडकर गटाचे दोन वेगवेगळे प्राचार्य कॉलेजमध्ये बसतात. पण या दोन्ही गटाचा वाद किती टोकाला पोहचलाय हे कॉलेजमधल्या सीसीटीव्ही फुटेजवरून कळेल.

आनंदरराज आंबेडकर गटाचे प्राचार्य असलेल्या उमाजी म्हस्के यांच्या प्राचार्य कार्यालयाबाहेर रामदास आठवले गटाचे प्राचार्य कृष्णा पाटील हे शिपायाकडून प्राचार्य कार्यलयाची चावी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. त्यांच्या सोबत चार गुंड दिसून येतायत. ५७ वर्षीय शहादेव खेत्रे यांना धक्काबुक्की करून त्यांच्याकडून चावी हिसकावून घेण्यात आली. तर कार्यालयातून काही महत्वाचे कागदपत्र गायब असल्याची माहिती उमाजी म्हस्के यांनी दिली. 

इतकंच नव्हे तर कार्यालयाची चावी घेतल्यानंतर आठवले गटाच्या प्राचार्य आणि त्यांच्या गुंडांनी उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कॉलेजमधून बाहेर काढू लागले. हेही सारं सीसीटीव्हीत कैद होऊनही पोलिसांनी केवळ एनसी दाखल करून घेतलीय. याआधीही उमाजी म्हस्के यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांची निलंबन पत्रावर सही घेण्यात आल्याचा आरोपही उमाजी म्हस्के यांनी केलाय. तर कृष्णा पाटील यांनी पिपल्स एज्यूकेशन सोसायटीवर केवळ रामदास आठवलेंचा अधिकार असल्याचा दावा केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.