रेल्वे रुळांखाली झोपण्याचा जीवघेणा स्टंट!

धावत्या रेल्वेतली स्टंटबाजी आपण आजवर पाहिलीय. पण धावत्या ट्रेनखाली स्टंट करणारी ही दृश्यं हादरवून टाकणारी आहेत. ही मुलं ज्या पद्धतीनं स्टंट करण्यासाठी रेल्वे रूळावर झोपताहेत. लोकल ट्रेन वरून जाईपर्यंत रूळावरच झोपून राहताहेत. हा सगळाच प्रकार अंगावर काटा आणणारा आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 26, 2013, 11:34 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
धावत्या रेल्वेतली स्टंटबाजी आपण आजवर पाहिलीय. पण धावत्या ट्रेनखाली स्टंट करणारी ही दृश्यं हादरवून टाकणारी आहेत. ही मुलं ज्या पद्धतीनं स्टंट करण्यासाठी रेल्वे रूळावर झोपताहेत. लोकल ट्रेन वरून जाईपर्यंत रूळावरच झोपून राहताहेत. हा सगळाच प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. ही दृश्य तुम्हाला विचलीत करु शकतात.
ही जीवघेणी, धोकादायक स्टंटबाजी करण्याची बुद्धी या मुलांना होते कशी..? आयुष्यातील आनंदापासून कोसो दूर असलेली ही मुलं आयुष्यापासून तुटायचा हा खेळ एन्जॉय कसा करतात..? आईची माया आणि बापाचा धाक नसल्यानंच ही मुलं असं करू धजावतात का..? अशी प्रश्नांची मालिकाच यानिमित्तानं पुढं आलीय.
मुंबई सेंट्रल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र त्रिवेदी यांनी ही मोबाईल क्लीप मीडियाला दिलीय. एका जागरूक नागरिकानं त्यांना ही क्लीप पाठवली होती. धोकादायक स्टंट करणारी ही मुलं आणि हे दृश्य मुंबईच्या जवळपासचीच असावीत, असा अंदाज आहे. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न रेल्वे पोलीस करतायत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ