मुंबई स्मार्ट सिटीवरुन भाजप-शिवसेनेत तू तू मैं मैं

सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमध्ये असलेल्या मतभेदांमुळेच स्मार्ट सिटी मोहिमेतल्या पहिल्या यादीत मायानगरी मुंबई वगळली गेल्याची शक्यता आहे.

Updated: Jan 29, 2016, 06:04 PM IST
मुंबई स्मार्ट सिटीवरुन भाजप-शिवसेनेत तू तू मैं मैं title=

मुंबई : सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमध्ये असलेल्या मतभेदांमुळेच स्मार्ट सिटी मोहिमेतल्या पहिल्या यादीत मायानगरी मुंबई वगळली गेल्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेमध्ये ९६ शहरांकडून आलेल्या प्रस्तावांमधून पहिल्या टप्प्यात २० शहरांची निवड केली गेली आहे. यात देशाची आर्थिक राजधानी मुंबई नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय.

 

प्रस्ताव पाठवताना मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेने अनेक उपसूचना जोडल्या होत्या. त्या केंद्र सरकारला रुचल्या नसल्याचेच दिसत आहे. दरम्यान, आणखी २३ शहरांसाठी केंद्र सरकारने एक मार्ग खुला ठेवलाय. या २० शहरांच्या जोडीला आणखी २३ शहरांचाही विचार केंद्र सरकार करत आहे.

या शहरांच्या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी आहेत. त्या दूर करून १५ एप्रिलपूर्वी नव्यानं प्रस्ताव दिल्यास या शहरांचाही पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात येणार आहे. या २३ शहरांमध्ये मुंबई आहे का? आणि मुळात आपला प्रस्ताव पास व्हावा, अशी मुंबई महापालिकेची इच्छा आहे का, असा प्रश्न आहे.

 

देशातील स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीत मुंबईचा समावेश नसल्यानं आता भाजप आणि शिवसेनेत जुंपली आहे. आशिष शेलारांनी याला शिवसेनेला जबाबदार ठरवले आहे.