दिवाळीत चीनी बनावटीच्या वस्तू न विकण्याचा मुंबईतील व्यापाऱ्यांचा निर्णय

दिवाळीत चायनिज गोष्टी वापरु नका असं आवाहन केलं जातंय. आता तर व्यापाऱ्यांनीच चायनिज वस्तू विकण्यास नकार दिला आहे.

Updated: Oct 21, 2016, 06:47 PM IST
दिवाळीत चीनी बनावटीच्या वस्तू न विकण्याचा मुंबईतील व्यापाऱ्यांचा निर्णय title=

मुंबई : दिवाळीत चायनिज गोष्टी वापरु नका असं आवाहन केलं जातंय. आता तर व्यापाऱ्यांनीच चायनिज वस्तू विकण्यास नकार दिला आहे.

दिवाळीसाठी चीनी बनावटीच्या वस्तू न विकता मेड इन इंडियाचं वस्तू विकण्याचा निर्णय मुंबईतल्या दुकानदारांनी घेतलेला दिसतोय. चीन पाकिस्तानला करत असलेल्या मदतीमुळे आता मुंबईतील दुकानदारांनी चीनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकायचे ठरवले आहे. 

दरम्यान, या चायनीज वस्तूंना पर्याय काय? याचं उत्तर मात्र कुणाकडेही नाही. आता, मात्र चायनीज लायटिंगवर पर्याय शोधून काढलाय तो कोल्हापूरच्या उद्योजक कुटुंबाने. चायनीय लाईटिंगच्या तोडीस तोड आणि तितक्याच टिकाऊ अशा या लायटिंगच्या माळा बनवल्यात कोल्हापुरातल्या शिवाजीराव डफळे आणि कुटुंबीयांनी. कोल्हापुरी लायटिंग नावानं प्रसिद्ध होत असलेल्या या लायटिंगला कोल्हापूरसह बेळगाव, गोवा आणि इतर राज्यातून चांगली मागणी आहे.