पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगल दोषी

मुंबईतल्या पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीच्या हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगलला दोषी ठरवण्यात आलंय. मुंबई सत्र न्यायालयानं त्याला दोषी ठरवलंय. दोषी ठरलेल्या सज्जादला 3 जुलैला शिक्षा सुनावली जाणार आहे.

Updated: Jun 30, 2014, 12:58 PM IST
पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगल दोषी title=

मुंबई: मुंबईतल्या पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीच्या हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगलला दोषी ठरवण्यात आलंय. मुंबई सत्र न्यायालयानं त्याला दोषी ठरवलंय. दोषी ठरलेल्या सज्जादला 3 जुलैला शिक्षा सुनावली जाणार आहे.

हा खटला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आला होता. निकम यांनी सज्जादला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी कोर्टाकडे केलीय. पल्लवी पुरकायस्थ मुंबईतल्या वडाळा इथल्या भक्तीपार्कमधल्या हिमालयन हाईट्समध्ये राहत होती. त्या इमारतीचा वॉचमन सज्जाद अहमद मुगलनं पल्लवीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. पूरकायस्थ निर्माता-अभिनेता फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या लिगल सेलमध्ये सल्लागार होती.

अशी घडली घटना

९ ऑगस्ट २०१२ रोजी पल्लवी राहत असलेल्या वडाला भक्तीपार्क मधील हिमालय हाईट्स या इमारतीत तिच्याच घराची लाईट गेली. तेव्हा तिनं अविकला फोन केला. अविकनं पल्लवीला इलेक्ट्रीशन बोलण्यास सांगितलं. इलेक्ट्रिशन आल्यावर पल्लवीच्या घरात लाईट आली. पण थोड्या वेळानं पुन्हा लाईट गेली. यावेळी इलेक्ट्रिशन बरोबर वॉचमन सजाद मुगल पण आला होता.

लाइट नसल्याचा फायदा घेत त्यानं पल्लवीच्या घराची चावी चोरली आणि थोड्या वेळानं तो पल्लवीच्या घरात चोरलेल्या चावीनं दरवाजा उघडून आत शिरला. त्यानं पल्लीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण, पल्लवीनं त्याला जोरदार प्रतिकार केला. हे पाहून सजाद घाबरला आणि ही जिवंत राहिली तर का़य खरं नाही? हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं त्याच्या जवळील धारधार हत्यारानं तिची हत्या केली आणि हत्यार तिसऱ्या माळ्यावर टाकून तो पळून गेला. पल्लवीच्या प्रतिकारादरम्यान सजादच्या हातावर जखमा झाल्या होत्या. त्यावरुन पोलिसांनी सजादला अटक करुन खाक्या दाखवताच त्यानं गुन्हा कबूल केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.