मुंब्र्याची इशरत जहाँ ही लष्कर ए तोएबाची आत्मघातकी हल्लेखोर : हेडली

 मुंब्र्यात राहणारी इशरत जहाँ ही लष्कर ए तोएबाची आत्मघातकी हल्लेखोर होती असं आज डेव्हिड हेडलीनं कोर्टात सांगितलं. 

Updated: Feb 11, 2016, 12:00 PM IST
मुंब्र्याची इशरत जहाँ ही लष्कर ए तोएबाची आत्मघातकी हल्लेखोर : हेडली title=

मुंबई : २६ /११ हल्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड हेडलीच्या साक्षीमधला सर्वात मोठा गौप्यस्फोट आज विशेष मकोका कोर्टात समोर आलाय.  मुंब्र्यात राहणारी इशरत जहाँ ही लष्कर ए तोएबाची आत्मघातकी हल्लेखोर होती असं आज डेव्हिड हेडलीनं कोर्टात सांगितलं.

इशरत लष्कर ए तोएबाच्या बुस्टअप ऑपरेशनमध्ये सहभागी होणार होती.  गुजरातमधलं अक्षरधाम मंदिर इशरतच्या निशाण्यावर होतं असंही हेडलीनं म्हटलंय.  आज चौथ्यादिवशी अमेरिकेतल्या अज्ञात स्थळावरून व्हिडओ कॉन्फरन्सिंग द्वारे हेडलीची साक्ष सुरू आहे.

 

काल ही प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे खंडित झाली होती. आज प्रक्रिया सुरू झाल्यावर हेडलीनं 26/11 च्या हल्ल्यासाठी आर्थिक मदतही पाकिस्तानमधून आल्याचं कबूल केलं. पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी मेजर इक्बाल आणि लष्कर ए तोएबा साजीद मीर यांनी मिळून हेडलीला वारंवार पैसे पाठवल्याचं आजच्या सुनावणीत हेडलीनं स्पष्ट केलं. हल्लापूर्वी हेडलीनं मुंबईतल्या ताडदेव परिसरात एक व्यवसाय थाटल्याचीही माहिती दिलीय.