नारायण राणे आणि निरूपम सेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल

 पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आणि आताचे काँग्रेसचे पॉवरफूल नेते नारायण राणे आणि संजय निरूपम या दोघांनी शिवसेनेला मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी पाठिंबा द्यावा यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह केला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 24, 2017, 08:20 PM IST
नारायण राणे आणि निरूपम सेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल title=

मुंबई :  पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आणि आताचे काँग्रेसचे पॉवरफूल नेते नारायण राणे आणि संजय निरूपम या दोघांनी शिवसेनेला मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी पाठिंबा द्यावा यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह केला आहे. 

सूत्रांनी झी २४ तासला दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांनी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली आहे. त्यांना या नवीन समिकरणाची माहिती दिली आहे. आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे या दोन्ही नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

दरम्यान, पाठिंब्यासंदर्भात शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची अनौपचारीक चर्चा सुरू असल्याची  माहिती सूत्रांनी दिली आहे.