गिरीश महाजन यांच्यावर राणेंचा प्रहार

काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आपल्या पराभवावर प्रतिक्रिया देतांना, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेचा प्रहार केला आहे. गिरीश महाजन यांनी आपली अवकात ओळखावी, त्यांनी नको ते धाडस करू नये, असं खणखणीत उत्तर नारायण राणे यांनी गिरीश महाजन यांना दिलं आहे.

Updated: Apr 15, 2015, 05:19 PM IST
गिरीश महाजन यांच्यावर राणेंचा प्रहार title=

मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आपल्या पराभवावर प्रतिक्रिया देतांना, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेचा प्रहार केला आहे. गिरीश महाजन यांनी आपली अवकात ओळखावी, त्यांनी नको ते धाडस करू नये, असं खणखणीत उत्तर नारायण राणे यांनी गिरीश महाजन यांना दिलं आहे.

दरम्यान, नारायण राणे यांचा वांद्रे इस्टमधून पराभव झाल्यानंतर, गिरीश महाजन यांनी नारायण राणे यांच्या पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती, यावेळी बोलतांना गिरीश महाजन म्हणाले होते, "नारायण राणे यांचा हा दुसरा पराभव आहे, आता त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी, त्यांच्या मुलांच्या पाठिशी त्यांनी राजकारणात उभं रहावं" असा सल्ला गिरीश महाजन यांनी दिला होता. यावर नारायण राणे यांनी गिरीश महाजन यांना आपली अवकात ओळखावी असं उत्तर दिलं आहे.

गिरीश महाजन यांनी सार्वजनिक कार्यक्रमात पिस्तूल कमरेला लावल्याने त्यांच्यावर मध्यंतरी मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.