नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नका - मुक्ता

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन एक महिना उलटला तरी तपास लागलेला नाही. याबाबत राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असताना नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नये असं आवाहन त्यांची मुलगी मुक्ता यांनी केली आहे. तर दाभोलकरांच्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची मागणी आपण अजून केलेली नाही, असं हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केलंय. तशी मागणी अजून दाभोलकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 20, 2013, 12:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन एक महिना उलटला तरी तपास लागलेला नाही. याबाबत राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असताना नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नये असं आवाहन त्यांची मुलगी मुक्ता यांनी केली आहे. तर दाभोलकरांच्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची मागणी आपण अजून केलेली नाही, असं हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केलंय. तशी मागणी अजून दाभोलकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारवर तोफ डागली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रश्नी तपास करण्यास सरकारला अपयश आले आहेत. या हत्याप्रकरणी सरकारबाबत संशय निर्माण होत आहे. त्यांचाच हात नाही ना, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.
अनिंसचे कार्यकर्ते यांनी काल राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज यांनी टीका केली. सरकारकडून दाभोलकर हत्या तपासप्रकरणी हालचाली दिसत नाहीत. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या अद्याप तपास का लागला नाही, असा सवालही राज यांनी उपस्थित केला. दाभोलकरांच्या हत्येमागे सरकारचाच हात नाही ना?, असा निशाणा राज ठाकरेंनी सरकावर साधला होता.
राज यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली. ते म्हणालेत राज हे अनुभवावरून बोलत आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही हे प्रसिद्धीचे नाटक आहे, असे म्हटले होते. त्यामुळे दाभोलकर हत्या प्रकरणावर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. याकडे लक्ष वेधले असता मुक्ता दाभोलकर यांनी आपले मत व्यक्त केले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

राज ठाकरेंना उत्तर