अरबी समुद्रात थरारनाट्य, बुडत्या जहाजातून २० जणांची नौदलानं केली सुटका

वसईपासून २५ नौटीकल मैलावर अरबी समुद्रात जिंदाल कामाक्षी या मालवाहू जहाजावर अडकलेल्या २० खलाशांना वाचविण्यात आलंय. हे मालवाहू जहाज बुडण्याची शक्यता निर्माण झाल्यानं. काल रात्री उशिरा या मालवाहू जहाजावरून नौदलाला मदतीसाठी तातडीचा संदेश पाठवण्यात आला होता. 

Updated: Jun 22, 2015, 01:06 PM IST
अरबी समुद्रात थरारनाट्य, बुडत्या जहाजातून २० जणांची नौदलानं केली सुटका title=

मुंबई: वसईपासून २५ नौटीकल मैलावर अरबी समुद्रात जिंदाल कामाक्षी या मालवाहू जहाजावर अडकलेल्या २० खलाशांना वाचविण्यात आलंय. हे मालवाहू जहाज बुडण्याची शक्यता निर्माण झाल्यानं. काल रात्री उशिरा या मालवाहू जहाजावरून नौदलाला मदतीसाठी तातडीचा संदेश पाठवण्यात आला होता. 

रात्रीपासूनच नौदलानं जहाजावर अडकलेल्या २० खलाशांना वाचवण्यात यश मोहीम सुरू करत अखेर त्या २० खलाशांना वाचविण्यात नौदलाला यश आलंय. त्यासाठी एक हेलिकॉप्टर आणि एक नौका वसईच्या समुद्रात धाडण्यात आली होती. 

पण खराब हवामानामुळं मदत कार्यात अडथळे येत होते. जहाज एका बाजूला झुकल्याचं नौदलानं दिलेल्या माहितीपत्रकात म्हटलंय. शिवाय सकाळी सातच्या सुमारास सर्व खलाशांना जहाज सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते, असंही नौदलानं सांगितलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.