राष्ट्रवादीने 144 चा आग्रह सोडला

राष्ट्रवादी काँग्रेसने 144 जागांचा आग्रह सोडल्याचे संकेत खुद्द शरद पवारांनी दिलेत. उमेदवारांचा विजय हाच जागा वाटपासाठी निकष असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय.

Updated: Aug 17, 2014, 06:14 PM IST
राष्ट्रवादीने 144 चा आग्रह सोडला title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने 144 जागांचा आग्रह सोडल्याचे संकेत खुद्द शरद पवारांनी दिलेत. उमेदवारांचा विजय हाच जागा वाटपासाठी निकष असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय.

यावेळी येत्या 19 तारखेला दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच विधानसभेत कामगिरी नक्की सुधारेल असा विश्वासही यावेळी पवारांनी व्यक्त केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.