राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध, २० रुपयांत चांगले जेवण

राज्यात शेतकरी, पोलीस, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी कठिबद्ध आहे. त्यांना चांगल्या सोयी सुविधा देण्यावर आपला भर आहे. आम्ही दिलेली आश्वासने पाच वर्षांत पूर्ण केली जातील, असे ठोस आश्वासन प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Updated: Oct 2, 2014, 03:37 PM IST
राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध, २० रुपयांत चांगले जेवण title=

मुंबई : राज्यात शेतकरी, पोलीस, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी कठिबद्ध आहे. त्यांना चांगल्या सोयी सुविधा देण्यावर आपला भर आहे. आम्ही दिलेली आश्वासने पाच वर्षांत पूर्ण केली जातील, असे ठोस आश्वासन प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

राष्ट्रवादीचा जाहीरनामा दिलीप वळसे - पाटील यांच्या नेतृत्वाखालील समितीने तयार केला आहे, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. या जाहीरनाम्याचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आर.आर. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादीने जनतेसाठी आश्वासनांची खैरात केली आहे. 

राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात काय? -

-अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणार .
- पोलिसांना मुंबईत हक्काचे घर देणार.
- औरंगाबाद, नागपूर आणि नाशिकमध्ये मोनोरेल सुरू करणार.
- चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक करणार .
- प्रत्येक जिल्हा विमानतळाला जोडण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार.
- ६० टक्के शेती ठिबक आणि तुषार सिंचनाखाली आणणार.
- १२वी पास मुलांना मोफत लॅपटॉप 
- महाविद्यालयात मोफत वायफाय सुविधा देणार.
- राज्यात गेल्या पाच वर्षांत ५५ हजार पोलिसांची भरती केली.
- सर्व एसटी स्थानकांवर २० रुपयांमध्ये स्वच्छ, सकस आहार देणार
- प्रत्येक जिल्ह्यात २४ तास विमान वाहतूक सुरु करण्यासाठी धावपट्ट्या

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.