आता... नेसनं लिहिलं पोलिसांना पत्र!

प्रीती झिंटा आणि नेस वाडिया वादानंतर उद्योगपती नेस वाडियानं मुंबई पोलिसांना उद्देशून एक पत्र लिहिलंय.

Updated: Jul 2, 2014, 08:20 PM IST
आता... नेसनं लिहिलं पोलिसांना पत्र! title=
फाईल फोटो

मुंबई : प्रीती झिंटा आणि नेस वाडिया वादानंतर उद्योगपती नेस वाडियानं मुंबई पोलिसांना उद्देशून एक पत्र लिहिलंय.

या पत्रात वाडियानं प्रीती झिंटा हिनं दाखल केलेली तक्रार साफ खोटी असल्याचं सांगितलंय. प्रीतीचे आरोप खोटे आहेत, हे पटवून देण्यासाठी नेसनं 9 साक्षीदारांच्या नावांचाही उल्लेख यात केलाय. हे सगळे साक्षीदार 30 मे रोजी मुंबई वानखेडे स्डेडियममध्येही झालेल्या आयपीएल मॅच दरम्यान उपस्थित होते, असंही नेसनं म्हटलंय. 

अभिनेत्री प्रीती झिंटा हिनं काही दिवसांपूर्वी 44 वर्षीय नेस वाडिया विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीय. 30 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये झालेल्या मॅच दरम्यान वाडियानं विनयबंग केल्याचं प्रीतीनं आपल्या तक्रारीत म्हटलंय. पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 30 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल मॅचदरम्यान वाडियानं प्रीतीशी छेडछाड केली होती.  

प्रीतीनं दाखल केलेल्या लिखित तक्रारीच्या आधारावर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी वाडियाच्या विरोधात आयपीएसी कलम 354 (महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्नात बळाचा वापर करणं), कलम 504 (जाणूनबुजून अपमान करणं), कलम 506 (धमकी देणं) आणि कलम 509 (शब्दांनी किंवा शील भंग करण्याच्या प्रयत्नात अपमानित करणं) अशा कलमांखाली गुन्हा दाखल केलाय.

प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांचे मधूर संबंध 2009 साली संपुष्टात आले होते. परंतु, त्यांच्यातील व्यावसायिक संबंध कायम होते.  

 

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.