मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी

देवेंद्र फडणवीस सरकारचा २९ किंवा ३० नोव्हेंबरला विस्तार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. यावेळी ६ कॅबिनेट आणि १४ राज्यमंत्री शपथ घेणार असल्याचं सांगितलं जातंय.

Updated: Nov 26, 2014, 04:30 PM IST
मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी title=

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारचा २९ किंवा ३० नोव्हेंबरला विस्तार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. यावेळी ६ कॅबिनेट आणि १४ राज्यमंत्री शपथ घेणार असल्याचं सांगितलं जातंय.
मंत्रिमंडळविस्तारात मित्र पक्षांनाही स्थान दिलं जाणार आहे.

विशेष म्हणजे महादेव जानकर आणि विनायक मेटेंचाही मंत्रिमंडळात समावेश आहे.

भाजपचे जामनेरचे आमदार गिरीश महाजन आणि कसबा पेठचे आमदार गिरीश बापट, सिंदखेडाचे आमदार जयकुमार रावळ आणि चैनसुख संचेती यांनाही कॅबिनेटमंत्रिपद मिळणार असल्याचं सांगितलं जातंय.

अपक्ष आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तारात अजून समावेश होत नसल्याचं दिसून येत आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी

कॅबिनेट मंत्री

१) गिरीश बापट
२) गिरीश महाजन
३) चैनसुख संचेती किंवा गोवर्धन शर्मा
४) महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष)
५) मंगलप्रभात लोढा 
६) सुनील देशमुख 

राज्यमंत्री

१) राम शिंदे
२) जयकुमार रावळ
३) संभाजी पाटील निलंगेकर
४) सुभाष देशमुख
५) सुरेश खाडे किंवा शिवाजीराव नाईक
६) सीमा हिरे किंवा देवयानी फरांदे
७) चंद्रशेखर बावनकुळे
८) कृष्णा खोपडे
९) बाळा भेगडे
१०) बबन लोणीकर
११) मदन येरावार
१२) सदाभाऊ खोत (स्वाभिमानी शेतकरी)
१३) विनायक मेटे (शिवसंग्राम)
१४) भूपेश थुलकर किंवा अविनाश महातेकर (आरपीआय)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.