आज घटस्थापना... नवरात्रीच्या रंगांत न्हाऊ चला!

आज घटस्थापना... नवरात्रीतली पहिली माळ... आजपासून नऊ दिवस नवरात्रीचे... हे नऊ दिवस जागरण, उपवास आणि दांडियाच्या रंगांनी उजळून निघतील.

Updated: Oct 16, 2012, 08:20 AM IST

www.24taas.com, मुंबई
आज घटस्थापना... नवरात्रीतली पहिली माळ... आजपासून नऊ दिवस नवरात्रीचे... हे नऊ दिवस जागरण, उपवास आणि दांडियाच्या रंगांनी उजळून निघतील. वेगवेगळे रंग ही तर या सणाची खासियत... मग, आवर्जुन आपले कपडेही त्याच रंगाचे असायला हवेत हा अट्टाहास आलाच की! चला तर एक नजर टाकुयात... या वर्षीच्या नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या रंगांवर...

क्रेझ नवरंगांची...
प्रतिपदा - १६ ऑक्टोबर २०१२ (मंगळवार) - लाल
द्वितीय - १७ ऑक्टोबर २०१२ (बुधवार) - आकाशी
तृतीया / चतुर्थी - १८ ऑक्टोबर २०१२ (गुरुवार) - पिवळा
पंचमी - १९ ऑक्टोबर २०१२ (शुक्रवार) - हिरवा
षष्टी - २० ऑक्टोबर २०१२ (शनिवार) - राखाडी
सप्तमी - २१ ऑक्टोबर २०१२ (रविवार) - नारंगी
अष्टमी - २२ ऑक्टोबर २०१२ (सोमवार) - पांढरा
नवमी - २३ ऑक्टोबर २०१२ (मंगळवार) - गुलाबी
विजयादशमी - २४ ऑक्टोबर २०१२ (बुधवार) - निळा