`जोशींना दादरमध्ये तरी कुणी ओळखतं का?`

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, October 12, 2013 - 20:16

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मनोहर जोशींवर तोंडसुख घेतलंय. `जोशींना दादरमध्ये तरी कुणी ओळखतं का? असा सवाल करत नितेश यांनी जोशींवर टीका केलीय.
मनोहर जोशी यांच्या षडयंत्रामुळेच राज ठाकरे आणि नारायण राणेंना शिवसेना सोडावी लागल्याचा घणाघाती आरोप नितेश राणे यांनी केलाय. आता तशीच वेळ त्यांच्यावर आल्यामुळे त्यांनी सेनेच्या पक्षनेतृत्वावर टीका केल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय.

दरम्यान, दुसरीकडे जोशींच्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मौन बाळगणंच पसंत केलंय. पंतांच्या विधानाशी आपला काहीही संबंध नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मात्र, जोशींवर शिवसेनेतून टीका होत असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी मात्र जोशींची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय. ‘राज्यात बाळासाहेबांच्या तुलनेत सर्वच नेते कमकुवत असल्याचं’ सांगत जोशींचा बचाव करण्याच प्रयत्न त्यांनी केलाय.

व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, October 12, 2013 - 20:10
comments powered by Disqus