शहीद जवान नितीन यांच्या पत्नीला मिळणार नोकरी

सरकारी नोकरीची हमी मिळेपर्यंत शहीद जवान नितिन इवलेकरांचं पार्थिव ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर त्यांना एक महिन्यात नोकरी दिली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर त्यांचा पार्थिव स्वीकारण्यात आलाय.

Updated: Jul 19, 2014, 03:50 PM IST
शहीद जवान नितीन  यांच्या पत्नीला मिळणार नोकरी title=

मुंबई : सरकारी नोकरीची हमी मिळेपर्यंत शहीद जवान नितिन इवलेकरांचं पार्थिव ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर त्यांना एक महिन्यात नोकरी दिली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर त्यांचा पार्थिव स्वीकारण्यात आलाय.

सकाळी अग्निशमनदलाचे शहीद जवान नितीन इवलेकरांचं पार्थीव पुन्हा भायखळा मुख्यालयात कुटुंबियांनी पाठवलं होतं. नितीन यांच्या पत्नीने थेट आरोप करताना आमची जबाबदारी कोण घेणार? जोपर्यंत सरकारी नोकरीत समावून घेण्याची हमी आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नाही, असं त्या म्हणाल्यात. त्यामुळे शहीद जवान नितीन इवलेकरांचं पार्थिव पुन्हा भायखळ्याच्या मुख्यालयात हलवण्यात आला.

अग्निशमन दलाच्या हलगर्जीपणामुळेच इवलेकरांचा मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांच्या पत्नीनं केला. नितीन यांच्या पश्चात त्यांच्या मुलांच्या भविष्याचं काय होणार, अशी चिंता आता त्यांच्या कुटुंबाला भेडसावतेय. 2005 साली वडिलांच्या जागी ते फायर ब्रिगडेमध्ये भरती झाले. 2010 पासून बोरिवली फायर स्टेशनला ते कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वीच ते विरारला नव्या घरात कुटुंबासह राहायला गेले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.