अंगणवाडी सेविकांना चार महिने मानधन नाही

अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे महागाईत घर कसे चालवायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालाय. मानधन मिळावे आणि अन्य मागण्यांसाठी आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला.

Updated: Jan 22, 2015, 08:31 AM IST
अंगणवाडी सेविकांना चार महिने मानधन नाही title=
मुंबईत आझाद मैदानात काढलेला मोर्चा

मुंबई : अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे महागाईत घर कसे चालवायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालाय. मानधन मिळावे आणि अन्य मागण्यांसाठी आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला.

काँग्रेस आघाडी सरकाने अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. 1 एप्रिल 2014 पासून अंगणवाडी सेविकांचे मानधन 4050 वरुन 5000 रुपये झाले. अंगणवाडी मदतनीसाचे मानधन 2000 वरुन 2500 रुपये तर मिनी अंगणवाडी सेविकेला 1950 ऐवजी 2400 रुपये मानधन झाले. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून त्यांना मानधन मिळालेले नाही. यामुळे अंगणवाडी सेविकांची आर्थिक घडी बिघडली आहे.

अंगणवाडी सेविकांना चार महिन्यांपूर्वी केवळ अर्ध्याच महिन्याचे मानधन हातावर टेकविण्यात आले आहे. त्यानंतर मानधन काढलेले नाही. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच मानधन नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.