आता सोनं खरेदी करा फक्त 50 रूपयात!

सोन्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता सामान्यांना ते खरेदी करणं थोडं अवघडच आहे. पण आता 50 रूपयात जर सोनं मिळत असेल तर! हो सराफा बाजारात एक अशी गोल्ड स्कीम आली आहे, ज्यामुळे दररोज फक्त 50 रूपये किंवा 1000 रूपये दर महिना याप्रमाणे तूम्ही सोनं खरेदी करू शकता.

Updated: Jul 24, 2014, 06:59 PM IST
आता सोनं खरेदी करा फक्त 50 रूपयात! title=

मुंबई: सोन्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता सामान्यांना ते खरेदी करणं थोडं अवघडच आहे. पण आता 50 रूपयात जर सोनं मिळत असेल तर! हो सराफा बाजारात एक अशी गोल्ड स्कीम आली आहे, ज्यामुळे दररोज फक्त 50 रूपये किंवा 1000 रूपये दर महिना याप्रमाणे तूम्ही सोनं खरेदी करू शकता.

मुंबईत सतयुग गोल्ड या कंपनीनं "मेरा गोल्ड" ही योजना बाजारात आणली आहे. ज्याचं कौतूक इतर सराफ व्यावसायिकांकडून देखील केलं जातंय. ही योजना बाजारात आणणारी सतयुग गोल्ड कंपनी आहे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची.

भारतीय सराफा बाजारात सध्या 10 ग्राम सोन्याची किंमत आहे 28,000रु. पासून 28,500 रु.पर्यंत आणि जर तुम्हाला एक ग्राम सोनं घ्यायचं असेल तर त्यासाठी 2800 ते 3000 आणि 500 मिलिग्राम सोन्यासाठी 1400 ते 1500 रुपये मोजावे लागतील. 

एक महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत लॉक इन पीरियड, हिडन चार्ज, मेकिंग चार्ज असं काहीही नाही. शिवाय हे सोनं शुद्ध 24 कॅरेट असेल याची 100 टक्के हमी कंपनी देतेय. तसंच यावर कोणतेही स्टोरेज चार्जही लागणार नाही.    
राज कु्ंद्रा याचं असं म्हणणं आहे की, या गोल्ड स्कीमचा फायदा त्या लाखो लोकांना होईल, जे दरमहिन्यात सोनं खरेदी करू शकत नाही. या स्कीमचा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन काही औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील. त्यानंतर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी सज्ज होऊ शकता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.