मुंबईत तळीरामांची संख्या वाढली

Last Updated: Tuesday, September 3, 2013 - 17:42

www.24taas.com झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या तळीरामांची गेल्या अठरा महिन्याच्या सर्वेक्षणानुसार मुंबईचा विचार करता पूर्व मुंबईत सर्वात जास्त ड्रंक एण्ड ड्राईव्हच्या घटना घडल्या आहेत. पूर्व मुंबईत ड्रंक एण्ड ड्राईव्हचे सुमारे ७ हजार ८१९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आणि यातून थोडा नाही तर एक कोटी ६८ लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
पूर्वी मुंबईच्या पुर्व भागात यांचे प्रमाण अधिक होते पण त्या खालोखाल आता दक्षिण मुंबईचा नंबर लागला आहे. या भागात ४ हजार ८८३ गुन्हे दाखल झाले असून १ कोटी ४ लाख एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. पश्चिम मुंबईत ड्रंक एण्ड ड्राईव्हचे ४ हजार ३८२ गुन्हे नोंदवत सुमारे ९१ लाखापेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य मुंबईत २ हजार ७४१ तळीरांमावर कारवाई करत ८३ लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर सर्वात खालोखाल उत्तर मुंबईत १ हजार ३०७ ड्रंक एण्ड ड्राईव्हच्या केस दाखल करत ६७ लाख १० हजाराचा दंड वसूल करण्यात आलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, September 3, 2013 - 17:42
comments powered by Disqus