फाटक्या नोटा बदलणाऱ्यांची चांदी

Last Updated: Wednesday, February 19, 2014 - 16:52

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रिझर्व्ह बँकेने २००५ आधीच्या नोटा बँकेत जमा करण्याची विनंती नागरिकांना केली आहे. चलनातून २००५ पूर्वीच्या नोटा काढून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे.
मात्र बऱ्याच दिवसांपासून फाटक्या नोटा बदलून त्यावर कमिशन घेणाऱयांची आता आणखी चांदी झाली आहे. चलनात आलेल्या २००५ पूर्वीच्या नोटा बदलून देण्याचा सपाटा त्यांनी चालवला आहे.
रिझर्व्ह बँकने २००५ पूर्वीच्या नोटा बदलून देण्याचं जेव्हापासून जाहीर केलं आहे, तेव्हा पासून या लोकांचा धंदा आणखी जोरात सुरू झाला आहे.
काही लोकांनी बँकेत जाण्यापेक्षा फाटक्या नोटा बदलून देणाऱ्यांकडून नोटा बदलून घेणं पसंत केलं आहे.
काहींनी बँकेत जाण्यास वेळ नाही, तर काहींना आपला पैसा काळापैसा म्हणून पकडला तर जाणार नाही, अशी भीती आहे.
मुंबईत झवेरी बाजार आणि मुलुंडमधील उपनगरांत अशा प्रकारची दुकानं मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी हे सर्व तथ्य हीन असल्याचं म्हटलं आहे.
पैसे घेणाऱ्यांच्या मते आम्ही एक लाखावर यापूर्वी ७०० ते ८०० रूपये कमिशन घेत होतो. आता आम्ही १००० ते १२०० रूपये कमिशन घेत आहोत.
किराणा दुकानदार, बिल्डर यांनी मोठ्या प्रमाणात पैसे बदलून घेण्यास पसंती दिली आहे, एजंटच्या मते पैसे घेणे धोक्याचे नाही, कारण २००५ पूर्वीच्या नोटा बदलून घेण्यास कोणतीही शेवटची तारीख नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 19, 2014 - 16:51
comments powered by Disqus