संपकरी प्राध्यापकांची सरकारविरोधात भाषा

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, May 1, 2013 - 16:24

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
सरकारनं कारवाईचा इशारा दिल्यानंतर संपकरी प्राध्यापकांनी उलट सरकारविरोधात आव्हानाची भाषा सुरु केलीये. राज्य सरकार आम्हाला मेस्मा लावू शकत नाही, असं संपकरी प्राध्यापकांची संघटना एमफुक्टोनं म्हटलयं.
सरकारनं आमच्यावर कारवाई करुन दाखवावीच असं आव्हानही त्यांनी दिलयं. संपाची पुढची रणनिती ठरवण्यासाठी पुण्यात शुक्रवारी बैठक बोलावण्यात आलीये. जे प्राध्यापक संपातून फुटून कामावर रुजू झालेत त्यांच्यावर संघटना कारवाई करणार असल्याचं एमफुक्टोचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी म्हटलयं.

८५ दिवसांपासून संप करुन विद्यार्थी आणि सरकारला वेठीस धरणा-या प्राध्यापकांवर कारवाईची कु-हाड कोसळणार आहे. ४ मे पर्यंत संप मागं न घेतल्यास प्राध्यापकांवर मेस्मांतर्गंत कारवाई केली जाणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी संपक-यांना अल्टिमेटम दिलाय. मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्र्यांनी कारवाईसाठी हिरवा कंदील दाखवलाय. त्यानुसार प्राध्यापकांवर मेस्मांतर्गत कारवाई केली जाणार आहे.
प्राध्यापकांचा पगार रोखणे, निलंबन आणि खात्यांतर्गत चौकशी केली जाणार आहे. प्राध्यापकांना थकबाकीची रक्कमही मिळणार नाही. सुरुवातीला नरमाईचं धोरण स्वीकारलेल्या सरकारनं आता कठोर भूमिका घेतलीये.

First Published: Wednesday, May 1, 2013 - 15:47
comments powered by Disqus