मुंबईत चार वर्षीय मुलीवर बलात्कार

By Aparna Deshpande | Last Updated: Tuesday, September 3, 2013 - 10:04

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबईत बलात्काराचं सत्र सुरूच आहे. २८ वर्षीय नराधमानं चार वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. घटना मुंबईतल्या ओशिवारा परिसरातली आहे. ओशिवारा पोलिसांनी आरोपीला पोलिसांनी अटक केलीय.
ओशिवारा इथं एका चार वर्षाच्या मुलीवर सलमान हफिज या नराधमानं रविवारी संध्याकाळी बलात्कार केला. तुकाराम ओंबळे पार्कमध्ये खेळत असलेल्या या मुलीला सलमाननं उचलून नेलं आणि पार्कपासून सुमारे ३०० मीटर दूर निर्जन स्थळी नेऊन त्यानं तिच्यावर बलात्कार केला.
पार्कातून मुलगी बेपत्ता झाल्याचं लक्षात आल्यानंतर पालकांनी शोधाशोध सुरू केली असता झुडपात ही मुलगी अत्यवस्थ अवस्थेत असल्याची आढळली. मुलीनं केलेल्या वर्णानानुसार परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या २५ संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यापैकी सलमानची ओळख पीडित मुलीनं पटविल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पीडित मुलीचे वडील मजूर आहे. आई आणि एका बहिणीसह ती जोगेश्वरीतल्या झोपडपट्टीत राहते. आरोपी सलमान हा मूळचा कोलकाता इथला असून तीन आठवड्यांपूर्वीच तो मुंबईत आला होता, अशी माहिती ओशिवरा पोलिसांनी दिलीय. ठाण्याचे सीनिअर इनस्पेक्टर नासीर पठाण यांनी दिली. दरम्यान, मुलीला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 3, 2013 - 10:04
comments powered by Disqus