पंकज भुजबळ यांना जामीन

पंकज भुजबळ यांना दिलासा मिळालाय. मनी लाँड्रिगप्रकरणी पंकज भुजबळ यांच्यावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती.

Updated: Jan 21, 2017, 08:29 PM IST
पंकज भुजबळ यांना जामीन  title=

मुंबई : पंकज भुजबळ यांना दिलासा मिळालाय. मनी लाँड्रिगप्रकरणी पंकज भुजबळ यांच्यावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. याप्रकरणी पंकज भुजबळ यांना दोन लाखांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यावर जामिन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना हा जामीन दिला.

भारत देश सोडून न जाण्याची अट या जामिनात ठेवण्यात आलीय. मनी लॉड्रिंगप्रकरणी पंकज भुजबळ यांच्याविरोधात इडी न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट जारी केलं होतं.

मनी लॉड्रिंग प्रकरणात तपासानंतर पंकज भुजबळ यांचा सक्रिय सहभाग आढळून आल्याचा दावा इडीने न्यायालयात केला होता. पुढील तपासाकरीता त्यांना अटक करण्याची परवानगी इडीने न्यायालयात मागितली होती. तर दुसरीकडे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीच आहेत.