फी वाढीविरोधात पालक थेट न्यायालयात

खाजगी शाळांकडून करण्यात आलेल्या फी वाढीविरोधात पालकांनी आता थेट कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Apr 24, 2017, 05:29 PM IST
फी वाढीविरोधात पालक थेट न्यायालयात title=

मुंबई : खाजगी शाळांकडून करण्यात आलेल्या फी वाढीविरोधात पालकांनी आता थेट कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय. 

मुंबईत येत्या शैक्षणिक वर्षापासून अधिकतर खासगी शाळेत फी वाढ करण्यात आलीय. त्याविरोधात पालकांनी आझाद मैदान इथं आंदोलनही पुकारली होतं. मात्र त्यानंतर राज्य सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेलं नाही. 

त्यामुळे पालकांसोबत फोरम फॉर फेअरनेस एज्युकेशन संस्थेकडून कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. यांत प्रामुख्याने युनिव्हर्सल, लोखंडवाला इंटरनॅशनल स्कूल, सिस्टर निवेदिता, गरोडिया हायस्कूल, ठाकूर इंटरनॅशनल, आयईएस अशा अनेक बड्या खासगी शाळांविरोधात ही याचिका असणार आहे.