बाळासाहेबांचे कायमस्वरूपी स्मारकासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कायमस्वरुपी स्मारकासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. 

Updated: Nov 17, 2014, 10:21 PM IST
बाळासाहेबांचे कायमस्वरूपी स्मारकासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री  title=

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कायमस्वरुपी स्मारकासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. 

मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. विनोद तावडे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित आदी मंत्री आणि भाजप नेते यावेळी त्यांच्यासोबत स्मृतीला अभिवादन केले... 

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात येणार असून, शिवसेना नेत्यांशी चर्चा करून स्मारक उभारण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय... दरम्यान, मुख्यमंत्र्यांचं स्मृतीस्थळावर आगमन झाल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.