महापौर बंगल्यावरच्या बाळासाहेबांच्या स्मारकाला मंजुरी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Updated: Feb 27, 2017, 04:56 PM IST
महापौर बंगल्यावरच्या बाळासाहेबांच्या स्मारकाला मंजुरी  title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महापौर बंगल्याची जागा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कोणत्याही चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

यापूर्वी सुधार समितीनं आचारसंहितेचा आधी मंजूरी दिली होती. एक रूपया नाममात्र दरानं 30 वर्षासाठी जमीन स्मारकासाठी ट्रस्टला मिळणार आहे.