मुंबई पालिकेला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी

अखेर गणपतीनं महापालिकेला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी दिलीय. गणपतीच्या आगमनाची महापालिकेनं तयारी केलीय. त्यासाठी खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

Updated: Aug 7, 2014, 09:39 AM IST
मुंबई पालिकेला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी title=

मुंबई : अखेर गणपतीनं महापालिकेला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी दिलीय. गणपतीच्या आगमनाची महापालिकेनं तयारी केलीय. त्यासाठी खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

गणेशाच्या आगमनासाठी २३ ऑगस्टपर्यंत मुंबईतले खड्डे बुजवणार असल्याचं महापालिकेनं सांगितलंय. त्यासाठी १५ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर सुनील प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सोव समिती, वाहतूक पोलीस आणि पालिका अधिका-यांची बैठक झाली. यावेळी गणेश मंडळांनी मुंबईत विविध रस्त्यांवर पडलेल्या तीन हजार खड्ड्यांची यादी पालिकेला दिली. त्यावर महापालिकेनं हे आश्वासन दिलंय.

पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईकर रोज खड्ड्यांमुळे महापालिकेच्या नावानं बोटं मोडत प्रवास करतायत. आता निदान गणपतीच्या निमित्तानं तरी मुंबईतले खड्डे बुजवण्याची सुबुद्धी महापालिकेला सुचलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.