हळदीच्या ठिकाणी पोलिसांचा लाठीचार्ज, ग्रामस्थ आक्रमक

कोपरखैरण्यातल्या हळदीच्या ठिकाणी झालेल्या हाणामारी प्रकरणी आता ग्रामस्थ आक्रमक झालेत. लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आता ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर आंदोलन सुरू केलं आहे. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत डीजे वाजत असल्याच्या कारणावरून काल नवी मुंबईच्या पोलिसांनी लग्नघरीच लाठीचार्ज केला.

Updated: Apr 20, 2017, 01:43 PM IST
हळदीच्या ठिकाणी पोलिसांचा लाठीचार्ज, ग्रामस्थ आक्रमक title=

नवी मुंबई : कोपरखैरण्यातल्या हळदीच्या ठिकाणी झालेल्या हाणामारी प्रकरणी आता ग्रामस्थ आक्रमक झालेत. लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आता ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर आंदोलन सुरू केलं आहे. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत डीजे वाजत असल्याच्या कारणावरून काल नवी मुंबईच्या पोलिसांनी लग्नघरीच लाठीचार्ज केला.

कुंदन गणेश म्हात्रे या तरुणाच्या लग्नाच्या हळदीच्या समारंभात हा प्रकार घडला. पोलिसांच्या मारहाणीत  मुलाची आई आणि वडिलासंह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी कोणतीही सूचना न देता मारहाण  केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.  तर डीजे बंद करण्यास सांगूनही  लग्नाला आलेल्यांनी धिंगाणा सुरूच ठेवला आणि पोलिसांशी हुज्जत घातली म्हणत पोलिसांनी या  मारहाणीचं समर्थन केलं आहे.