मनसे नगरसेवक संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

पर्युषण काळात मांसबंदीचा निषेध करण्यासाठी मनसेने दादर येथे मांसविक्रीचे दुकान उघडून निषेध केला. श्रावणात मांसविक्री दुकाने सुरू असतात मात्र दुस-या धर्माच्या दबावाखाली मांसबंदी का? असा सवाल यावेळी मनसे पदाधिका-यांनी विचारला.

Updated: Aug 29, 2016, 01:28 PM IST
मनसे नगरसेवक संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात title=

मुंबई : पर्युषण काळात मांसबंदीचा निषेध करण्यासाठी मनसेने दादर येथे मांसविक्रीचे दुकान उघडून निषेध केला. श्रावणात मांसविक्री दुकाने सुरू असतात मात्र दुस-या धर्माच्या दबावाखाली मांसबंदी का? असा सवाल यावेळी मनसे पदाधिका-यांनी विचारला.

आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर असताना मांसबंदीचा मुद्दा पुन्हा गरम होण्याची चिन्ह दिसत आहेत. यावेळी संदीप देशपांडेसह अनेक मनसे पदाधिका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.