सेनेचे प्रमोदनाना भानगिरे, राष्ट्रवादीचे सुनील टिंगरेही मनसेत!

शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील टिंगरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी या दोघांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 14, 2013, 07:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील टिंगरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी या दोघांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.
पक्षनेतृत्त्वाला कंटाळल्यामुळं प्रमोदनाना भानगिरे यांनी मनसेमध्ये प्रवेश केल्याचं समजतंय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रविवारी मुंबईत दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मुंबईतील शिवसेनेच्या कामगार संघटनांतील काही नेते आणि कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला.
याच पार्श्वभूमीवर पुण्यातील टिंगरे आणि भानगिरे यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला. पुणे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत टिंगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी नाकारली होती.
दरम्यान, याआधी आजच शिवसेनेचे उपनेते राजा चौगुले, संजय घाडी, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका संजना घाडी, माजी नगरसेवक आणि नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांनीही शेकडो कार्यकत्यांर्सह मनसेत प्रवेश केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.