सिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बर रेल्वे खोळंबली

मंगळवारी सकाळी ऑफिसला निघायच्या घाई-गरबडीतच हार्बर रेल्वे बोंबलली. सकाळी 8 वाजल्याच्या सुमारास हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. 

Updated: Sep 1, 2015, 03:22 PM IST
सिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बर रेल्वे खोळंबली title=

मुंबई : मंगळवारी सकाळी ऑफिसला निघायच्या घाई-गरबडीतच हार्बर रेल्वे बोंबलली. सकाळी 8 वाजल्याच्या सुमारास हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. 

वाशी रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या 20 ते 30 मिनिटं उशीरानं धावत आहेत. 

दरम्यान, सिग्नल दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.