पश्चिम रेल्वेचे प्रवाशी रखडले...

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, January 28, 2013 - 09:50

www.24taas.com, मुंबई
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. मध्यरात्रीच्या सुमारास कारशेडमध्ये जाणाऱ्या लोकलचा एक डबा रुळांवरुन घसरलाय. त्यामुळे पश्चिम मार्गावरील वाहतुकीवर सकाळ पासूनच परिणाम दिसून येतोय.

बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालीय. सकाळपासून धिम्या मार्गावरील २० टक्के लोकल रद्द झाल्यात. डबा घसरल्याचा परिणाम धिम्या मार्गावरील वाहतुकीवर झालाय. बोरिवली, कांदिवली, अंधेरी मालाड, गोरेगाव स्टेशन्सवर प्रवाशांची तोबा गर्दी झालीय. रेल्वेकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

First Published: Monday, January 28, 2013 - 08:46
comments powered by Disqus