संजय दत्तला जेलमध्ये पाठविणाऱ्या वकिलाने केली सलमानच्या वकिलांची प्रशंसा

 ज्या व्यक्तीने बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला जेलमध्ये पाठविले, दहशतवादी अजमल कसाब याला फाशी मिळवून दिली, गुलशन कुमार हत्याकांडात अनेक खुलासे केले त्या वकीलाने सलमान खानला जामीन मिळवून देण्याबद्दल त्याच्या वकिलांची प्रशंसा केली आहे. 

Updated: May 7, 2015, 02:54 PM IST
संजय दत्तला जेलमध्ये पाठविणाऱ्या वकिलाने केली सलमानच्या वकिलांची प्रशंसा title=

मुंबई  :  ज्या व्यक्तीने बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला जेलमध्ये पाठविले, दहशतवादी अजमल कसाब याला फाशी मिळवून दिली, गुलशन कुमार हत्याकांडात अनेक खुलासे केले त्या वकीलाने सलमान खानला जामीन मिळवून देण्याबद्दल त्याच्या वकिलांची प्रशंसा केली आहे. 

हो, आम्ही सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याबद्दल बोलतो आहे. उज्ज्वल निकम यांनी सलमान खानच्या वकिलांचा प्रशंसा करताना म्हटले आहे की, सलमान खानच्या वकिलांनी सेशन कोर्टाच्या सुनावणीपूर्वीच होमवर्क केला होता. 

सलमानच्या वकिलांनी यापूर्वीच योजना बनवली होती. शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे पुढचे पाऊल काय असले याची पूर्व तयारी सलमानच्या वकिलांची होती. सलमानच्या वकिलांनी शानदार कामगिरी केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.