यंदाचा अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा - विखे-पाटील

महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी कडाडून टीका केलीये. यंदा हा अर्थसंकल्प राज्यातील जनतेचा आणि शेतक-यांच्या अर्थसंकल्पातून अपेक्षांचा भंग अशी  टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलीये.

Updated: Mar 18, 2017, 06:19 PM IST
यंदाचा अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा - विखे-पाटील title=

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी कडाडून टीका केलीये. यंदा हा अर्थसंकल्प राज्यातील जनतेचा आणि शेतक-यांच्या अर्थसंकल्पातून अपेक्षांचा भंग अशी  टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलीये.

या अर्थसंकल्पात कर्जमुक्तीबाबत काहीच नाही. लाभेल माझ्या बळीराजाला कर्जाचा फास असा हा अर्थसंकल्प असल्याचे विखे-पाटील म्हणालेत. विखे-पाटील यांच्यासह जयंत पाटील यांनीही अर्थसंकल्पावर टीका केलीये.

शेतक-यांच्या तोंडाला पानं पुसणारा आणि राज्यातील जनतेला गाजर दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. ४६०० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पातून केवळ ३९६ कोटीचे अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणातील मुद्देच अर्थसंकल्पात आहेत. राज्याची आर्थिक स्थिती संकटात असल्याचे जयंत पाटील म्हणाले.