राधे माँ थीम पार्टीचा फोटो वायरल, ट्विटरवर जोरदार चर्चा

वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. सध्या एक खूप शेअर केला जातोय. यात एका किटी पार्टीची थीम राधे माँ आहे. यात १० महिला राधे माँ सारख्या लाल ड्रेसमध्ये, कपाळावर कुंकू आणि हातात त्रिशूल घेतलेल्या दिसत आहेत.

Updated: Aug 25, 2015, 10:58 PM IST
राधे माँ थीम पार्टीचा फोटो वायरल, ट्विटरवर जोरदार चर्चा title=

मुंबई: वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. सध्या एक खूप शेअर केला जातोय. यात एका किटी पार्टीची थीम राधे माँ आहे. यात १० महिला राधे माँ सारख्या लाल ड्रेसमध्ये, कपाळावर कुंकू आणि हातात त्रिशूल घेतलेल्या दिसत आहेत.

आणखी वाचा - राधे माँवर लैंगिक शोषणाचा डॉली बिंद्राचा आरोप

यातील एक महिला तर राधे माँच्या लेटेस्ट अवतारात म्हणजे स्कर्टमध्ये दिसतेय. राधे माँचा स्कर्टमधील फोटो राहुल महाजननं ट्विटरवर शेअर केले होते.

आणखी वाचा - पहिल्यांदा राधे माँचं स्टिंग ऑपरेशन

या महिला कोण आहेत याबाबत अजून कळलं नाही. सामान्य यूजर्सपासून तर पत्रकारांपर्यंत अनेकांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केलाय. अनेक जण हा फोटो पाहून नाराज झाले. तर एका यूजरनं आता आसाराम बापू थीम पार्टी कधी, असा प्रश्न विचारला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.