राहुल गांधी मुंबईत दाखल

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, March 1, 2013 - 12:21

www.24taas.com, मुंबई
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मुंबईत दाखल झालेत. उपाध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे.
राहुल गांधी आज सकाळीच काँग्रेसच्या मुख्यालयात टिळक भवनमध्ये पोहचले. या दौऱ्यात ते पक्षबांधणीच्या दृष्टीनं पदाधिकारी आणि आमदार, खासदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर तीन वाजेपर्यंत ते बैठकीत मुंबईतील लोकसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील.

मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचं अध्यक्षपदही सध्या रिक्त आहे, त्यामुळे याबातही ते मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत. पक्षबांधणीसाठी राहुल गांधींकडून पदाधिकाऱ्यांना विशेष कानमंत्र मिळण्याची शक्यता आहे.

First Published: Friday, March 1, 2013 - 12:21
comments powered by Disqus