१३ वर्षांत रेल्वे अपघातांत ५० हजार मृत्यूमुखी

माहितीच्या अधिकारा अंतर्गत रेल्वेशी संबंधित झालेल्या अपघातातल्या बळींची धक्कादायक संख्या समोर आलीय. 

Updated: Feb 9, 2016, 03:43 PM IST
१३ वर्षांत रेल्वे अपघातांत ५० हजार मृत्यूमुखी title=

मुंबई : माहितीच्या अधिकारा अंतर्गत रेल्वेशी संबंधित झालेल्या अपघातातल्या बळींची धक्कादायक संख्या समोर आलीय. 

२००२ ते २०१५ दरम्यान रेल्वेशी संबंधित मृतांची संख्येनं ५० हजारांचा आकडा पार केलाय. तसंच जवळपास इतकेच लोक जखमीही झालेत. यातील मध्य मार्गावर ३०,३५१, तर पश्चिम मार्गावर १९,८५२ बळी गेलेत. 

रेल्वे रुळ ओलांडताना ३१,५१५ बळी गेल्याचंही यात नमूद करण्यात आलंय. यानंतर सर्वात जास्त मृत्यू झालेत ते चालत्या रेल्वेतून खाली पडून... 

चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत दाखल केलेल्या अर्जावर उत्तर देताना 'रेल्वे पोलीस कमिशनरेट'नं ही माहिती दिलीय.