पाच बायका, पोलिसाची फजिती ऐका

मुंबईतील रेल्वे पोलीस असणाऱ्या दीपक मंडले या ४० वर्षीय पोलीसाने चक्क पाच लग्नं केल्याचं उघड झालं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 25, 2013, 08:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
समाजातील बेकायदेशीर कारवायांना आळा घाल्ण्याचं काम पोलिसांचं असतं. मात्र जर पोलीसच बेकायदेशीर कामं करत असेल तर? मुंबईतील रेल्वे पोलीस असणाऱ्या दीपक मंडले या ४० वर्षीय पोलीसाने चक्क पाच लग्नं केल्याचं उघड झालं आहे.
मुंबईच्या चर्चगेट रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दीपक रंगराव मंडले या पोलिसाने १९९४ पासून आतापर्यंत पाचजणींशी विवाह केल्याचे आज स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे यानंतर सहाव्या लग्नासाठीही त्याचं वधू संशोधन सुरू होतं. मात्र त्याच्याच एका पत्नीला याबद्दल माहिती कळल्यावर तिने पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली आणि दीपक मंडले यांना अटक करण्यात आलं.
दीपकसह त्याची आई आक्काताई रंगराव मंडले, मावशी सिंधूबाई, दिलीप जाधव व त्याची पत्नी अशा पाचजणांविरुद्ध आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. १९९२ मध्ये दीपक मंडले पोलिसांत भरती झाला. १६ मे १९९४ रोजी नंदा (रा. बोरगाव, ता. तासगाव) यांच्याशी त्याने पहिला विवाह केला. त्यानंतर २ डिसेंबर १९९५ रोजी दीपाली (पुणे) यांच्याशी आंतरजातीय विवाह, तर शालन (बेवनूर, ता. जत) यांच्याशी तिसरा, त्यानंतर रेखा (सरस्वतीनगर, तासगाव) यांच्याशी २१ जुलै २0१0 रोजी भिवघाटातील भीमाशंकर मंदिरात चौथा विवाह केला. मागील वर्षी म्हणजे १७ जानेवारी २0१२ रोजी दीपकने ज्योती (गार्डी, ता. खानापूर, जि. सांगली) यांच्यासोबत रेणावी येथील रेवणसिद्ध मंदिरात पाचवा विवाह केला.
दीपकला दोन पत्नींपासून तीन अपत्ये झाली आहेत. चौथ्या पत्नीची तक्रार पहिली पत्नी आपली नातेवाईक असल्याचे तो सांगे. दीपकला पोलिसाची कन्या असलेल्या रेखा या चौथ्या पत्नीने फिर्याद देऊन गजाआड केले. तिच्या या धाडसामुळे दीपक मंडले गजाआड झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close