आजपासून मोबाईलवर काढा रेल्वेचं तिकीट!

आता तुम्हाला लोकलचं तिकीट अथवा पास काढण्यासाठी रांगेत उभ राहण्याची आवश्यकता नाही. आजपासून लोकलचं तिकिट  उपलब्ध असणार आहे ते तुमच्या मोबाईलवर…

Updated: Dec 27, 2014, 09:20 AM IST
आजपासून मोबाईलवर काढा रेल्वेचं तिकीट! title=

मुंबई : आता तुम्हाला लोकलचं तिकीट अथवा पास काढण्यासाठी रांगेत उभ राहण्याची आवश्यकता नाही. आजपासून लोकलचं तिकिट  उपलब्ध असणार आहे ते तुमच्या मोबाईलवर…

थोड्याच वेळात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या सेवेचं उद्घाटन करणार आहेत. सर्वप्रथम ही सुविधा मध्ये रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या प्रत्येकी पाच-पाच स्टेशन्सवर उपलब्ध असणार आहे. 

मध्य रेल्वेवर कल्याण, ठाणे, कुर्ला,  दादर आणि मुंबई सीएसटी तर पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी आणि बोरीवली स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध असणार आहे.  

कसं काढायचं मोबाईलवर तिकीट... 
- तुमच्या अँन्ड्रॉईड मोबाईलमध्ये रेल्वेचं नवीन मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा
- लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा युजर आयडीही असेल. 
- अँड्रॉइड मोबाईल अॅपच्या सहाय्याने तुम्ही तिकीट खरेदी केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक कोड असलेला मेसेज येईल.
- हा कोड तुम्ही ही सुविधा उपलब्ध असणाऱ्या स्टेशनवरील 'एटीव्हीएम'वर जाऊन टाकल्यास तुम्हाला तात्काळ तिकीटाची प्रिंट मिळेल. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.