मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात, रेल्वे धिम्या गतीने

शुक्रवारी पावसाच्या तडाख्याने ठप्प पडलेली तिन्ही मार्गावरील रेल्वेची वाहतूक शनिवारी पूर्वपदावर येत असतानाच सकाळी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावलेय. पाऊस पडत असल्याने रेल्वे सेवा रडतकडत सुरु आहे. गाड्या ३० ते ४५ मिनिटे लेट असल्याने प्रवाशांचे हाल होत  आहे.

Updated: Jun 20, 2015, 02:56 PM IST
मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात, रेल्वे धिम्या गतीने title=

मुंबई : शुक्रवारी पावसाच्या तडाख्याने ठप्प पडलेली तिन्ही मार्गावरील रेल्वेची वाहतूक शनिवारी पूर्वपदावर येत असतानाच सकाळी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावलेय. पाऊस पडत असल्याने रेल्वे सेवा रडतकडत सुरु आहे. गाड्या ३० ते ४५ मिनिटे लेट असल्याने प्रवाशांचे हाल होत  आहे.

दरम्यान, कसारा येथे मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने कसाऱ्याच्या दिशेने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे शनिवारीदेखील प्रवाशांची डोकेदुखी कायम आहे. मध्ये रेल्वेची वाहतूक शनिवारी सकाळी जरी सुरू झाली असली तरी बहुतेक गाड्या ३० ते ४५ मिनिटे उशीराने धावत होत्या. तर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत.

सकाळच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर वाढला आहे. तसेच हवामान खात्याने येत्या २४ तासात पुन्हा पाऊस जोर धरेल, असा अंदाज व्यक्त केल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुंबई आणि उपनगरात जून महिन्यातील रेकॉर्डब्रेक पाऊस पडल्याने तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. शुक्रवार रात्री पावसाचा जोर ओसरल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.  पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. मात्र या मार्गांवरील वाहतूकही विलंबाने सुरु आहे.  शनिवारी मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून दुपारी समुद्रात भरती येणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.