मुंबई आणि उपनगरांत पावसाची जोरदार हजेरी

गेल्या काही  दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांत जोरदार हजेरी लावली.

Updated: Aug 27, 2016, 08:51 AM IST
मुंबई आणि उपनगरांत पावसाची जोरदार हजेरी  title=

मुंबई : गेल्या काही  दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांत जोरदार हजेरी लावली.

विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव या पश्चिम उपनगरांसह भांडुप, विक्रोळी, मुलुंडमध्ये  आज सकाळीच पावसाची दमदार बॅटींग पहायला मिळाली. 

दादर, माटुंगा आणि परळमध्येही पहाटेपासून पाऊस बरसत होता. दुसरीकडे नवीमुंबई परिसरालाही पावसानं चांगलंच झोडपलं. या पावसाने रस्ते वाहतूकीवर कोणताही परिणाम झाला नसला तरी मध्य रेल्वेची वाहतूक दहा मिनीटे उशीराने सुरु आहे.

Tags: