राज-उद्धव एकत्र आल्यास आनंद होईल- गडकरी

By Prashant Jadhav | Last Updated: Tuesday, October 9, 2012 - 20:26

www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र आले तर सर्वात जास्त आनंद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना होईल. मलाही या घटनेचा आनंद होईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
राजकारण सोडले तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंवरही प्रेम केले आणि उद्धव ठाकरेंवरही प्रेम केले. त्यांचा परिवार एकत्र झाला आणि ते राजकारणात एक झाले तर माझ्या सारख्या भाजपच्या कार्यकर्त्याला या करीता आनंद होईल की बाळासाहेबांनी ज्या विचारासाठी संघर्ष केला, त्या बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर ही दोन्ही भावंड एकत्र आलीत. तर राजकारणापेक्षाही मनाला आनंद देणारी ही मोठी घटना आहे, असेही गडकरी यांनी मुलाखती सांगितले.
प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या चष्माने बघू नये, मी तर बघत नाही. मी बाळासाहेबांचा खूप चाहता आहे. त्यामुळे मला प्रामाणिकपणे वाटते की, बाळासाहेबांच्या या आजच्या स्थितीमध्ये उद्धव आणि राज एकत्र आलेत तर बाळासाहेबांना याचा आनंद खूप होईल, असेही त्यांनी सांगितले.First Published: Tuesday, October 9, 2012 - 20:26


comments powered by Disqus