राज ठाकरेंची नवी मागणी, अटक वॉरंट रद्द

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, June 12, 2013 - 13:16

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
ऑक्टोबर, २००८ साली रेल्वे भरती परीक्षेदरम्यान परप्रांतिय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे आज वांद्रे कोर्टात हजर राहिले. त्यानंतर त्यांच्यावर बजावण्यात आलेलं अटक वॉरंट रद्द करण्यात आलं. दरम्यान, राज यांनी नवी मागणी केलेय.
गरज वाटेल तेव्हा सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेशही कोर्टानं राज ठाकरेंना दिलेत. याप्रकरणी आपल्याला दोषमुक्त करण्यात यावं, यासाठी राज ठाकरेंनी अर्ज केलाय. घटना घडली त्यावेळी आपण तिथं हजर नव्हतो, असा युक्तीवाद राज यांच्या वकिलांनी केला. या अर्जावर १ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

ऑक्टोबर २००८ मध्ये डोंबिवली व कल्याणात मनसैनिकांनी आक्रमक होत परप्रांतीयांना मारहाण केली व त्याप्रकरणी पोलिसांनी मनसैनिकांसह पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना सहआरोपी केलं होतं. ठाकरे यांना २१ ऑक्टोबर रोजी अटक करुन मानपाडा पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं. त्यावेळी मनसैनिकांनी कल्याण व डोंबिवलीत प्रचंड तोडफोड करुन संताप व्यक्त केला होता.
याप्रकरणातील काही सुनावणीसाठी काही वेळा राज ठाकरे याप्रकरणातील सुनावणीला कल्याण कोर्टात हजर राहिले. त्यानंतर मात्र त्यांनी सुनावणीला फारसं महत्त्व न देता घरी राहणंच पसंत केलं. अखेर कोर्टाला त्यांच्यावर वॉरंट बजवावं लागलं होतं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 12, 2013 - 13:14
comments powered by Disqus