राज ठाकरे, आशिष शेलारांना कारणे दाखवा नोटीस

होर्डिंग्ज प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि  भाजपचे आमदार आशिष शेलार तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Updated: Mar 12, 2015, 07:08 PM IST
राज ठाकरे, आशिष शेलारांना कारणे दाखवा नोटीस title=

मुंबई : होर्डिंग्ज प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि  भाजपचे आमदार आशिष शेलार तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात यापूर्वी झालेल्या सुनावणीवेळी होर्डिंग लावली जाणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंग लावल्यामुळे याचिकाकर्त्यांनी पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यावेळी न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याने राज ठाकरे अडचणीत आलेत. न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला का चालविण्यात येऊ नये असे विचारत खुलासा करावा, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.