नाशिकवरून राज ठाकरे मुंबईत परतलेत, टीकेची झोड कायम

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, January 11, 2014 - 18:45

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नाशिक दौऱ्यावरून राज ठाकरे मुंबईत परतलेत. मात्र, राज यांच्या व्यक्तव्यावरून भाजप आणि मनसेत दुरावा झालाय. आता तर महाराष्ट्रात आम्हीच बाप आहोत असं ठणकावणा-या राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी तातडीने प्रत्युत्तर दिलं होतं. आता छगन भुजबळ यांनी राज यांना टोला मारलाय. महाराष्ट्राचा बाप होण्याचं स्वप्न पाहण्यापेक्षा प्रबोधनकारांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवा असं भुजबळ यांनी म्हणाले.
भाजपनं बहिष्कार टाकल्यानं आधीच वादग्रस्त ठरलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते होणा-या विविध कामांच्या भूमिपूजन सोहळ्यानं शहरातील वाहतूक व्यवस्था चांगलीच कोलमडली. सिडको, नादुरनाका परिसरातील मोठे रस्ते असो वा गावठाण भागातील दाटीवाटीचे रस्ते प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा वावर कमी जाणवत असल्यानं वाहतुकीच नियोजन पूर्णतः तीनतेरा वाजले.
महापौरांच्या प्रभागात तर खुद्द राज ठाकरे यांनी गाडीतून खाली उतरून वाहतुकीच नियोजन केलं. शहराच्या मध्यवस्तीत मोडणाऱ्या अशोकस्तंभ परिसरात भूमिपूजन सोहळा असल्यानं राज ठाकरे पोहोचण्याच्या १ तास आधीपासून वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर याचं ट्रफिक जाममधून मार्ग शोधात राज मुंबईला रवाना झालेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 11, 2014 - 18:41
comments powered by Disqus