राज ठाकरेंची शहिदांना मानवंदना

Last Updated: Wednesday, May 1, 2013 - 13:50

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या शहिदांना आज महाराष्ट्र दिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. हुतात्मा चौकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहिदांना मानवंदना दिली.
विविध कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही हुतात्मा चौकात जाऊन आदरांजली वाहिली... महाराष्ट्राचा ५३वा वर्धापनदिन आज राज्यभर साजरा होतोय. मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल के. शंकर नारायण यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध देशांचे राजदूत या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्य सुरक्षा दलासह मुंबई पोलीस, महिला पोलीस दल, अग्नीशमन दल यांचं दिमाखदार संचलन यावेळी झालं. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सक्षम असल्याची ग्वाही राज्यापालांनी यावेळी दिली.

First Published: Wednesday, May 1, 2013 - 13:46
comments powered by Disqus