शाहरूख हा काय दहशतवादी आहे का? - राज ठाकरे

Last Updated: Tuesday, May 7, 2013 - 14:01

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘शाहरूख खान हा काय दहशतवादी आहे का?’ `मला असं वाटतं मागच्या वेळेला ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या.. अशाप्रकारची गोष्ट करणं म्हणजे बालीश आहे. मागच्या वेळेस ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या त्या चुकीच्या आहेत. पण झाली आता ती गोष्ट...’ ‘जी काही वादावादी झाली, जे झालं ते चुकीचं झालं पण आता तो काय दहशतवादी आहे का, त्याला त्या परिसरात येऊ द्यायचं नाही आणि वैगरे... काय हा बालीशपणा आहे.’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शाहरूख आणि एमसीए वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘शाहरूख तसाही एका संघाचा मालक आहे. त्यामुळे एका संघाचा मालक या अर्थाने तुम्ही कोणाला थांबवू शकत नाही. अशाप्रकारे बालीशपणा करू नये. त्यामुळे झाला तो वाद झाला. तो विषय आता बंद करावा.’ असं म्हणत राज ठाकरे यांनी अभिनेता शाहरूख खानची पाठराखण केली आहे. आज काँग्रेसकडूनही शाहरूखची पाठराखण करण्यात आली.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत. यांनी एमसीएला एक पत्र लिहून शाहरूखला वानखडे मैदानावर प्रवेश मिळावा अशी मागणी केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनीही शाहरूखची पाठराखण करीत एमसीएला हा वाद मिटविण्यास सांगितले आहे. राज ठाकरे यांची ही भूमिका अनपेक्षितरित्या आल्याने अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या.

First Published: Tuesday, May 7, 2013 - 13:57
comments powered by Disqus